सातारा . दि ०६ .सातारा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत. पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घालवण्यात आले आहे.