अपघात

देव दर्शनाला निघालेल्या ओमिनी कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार तर चौघेजण गंभीर जखमी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-

सातारा दि. १० .  सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानजीक सूर्याचीवाडी हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास ओमिनी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या ओमिनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविकांना बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी घेवून जात असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आदळून हा अपघात झाला. या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले, तर चौघेजण गंभीर जखमी आहेत.

अपघाताचे वृत्त समजताच वडूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने हलविले. अपघातात ठार व जखमी झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. मात्र, हे सर्वजण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात पहाटेच्या वेळेस कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!