धार्मिकमहाराष्ट्रसातारा

चैतन्य कचरनाथ स्वामी महाराज दिंडीचे पंढरपूर* तालुक्यात प्रस्थान 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संजय वांगडे 

कुसुंबी दि.०७. क्षेत्र कासवंड चोरमलेवाडी परिसर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी नामदिंडी सोहळ्याचे आज नवव्या दिवशी सातारा जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.

श्री कासवंड चोरमलेवाडी, भिलार, परिसरातून गेली पंधरा वर्षे नाम दिंडी सोहळा संपन्न होत आहे .या दिंडी सोहळ्याचे दिंडी प्रमुख ह.भ.प. श्री दत्तात्रय महाराज गाढवे आण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील सर्व वारकरी संप्रदायातील भाविक भक्त सहभागी होत आहेत. ह. भ. प. दत्तात्रय महाराज गाढवे यांनी कासवंड चोरमलेवाडी परिसरातील अनेक लोकांना वारकरी साहेब साप्रदायाची ओढ लावून अनेक कीर्तनकार घडवले आहेत. त्यांच्या या कार्यात कासवंड, चोरमलेवाडी, तळेमाळ, भिलार, परिसरातील या दिंडीसोहळ्यात गेली पंधरा वर्षे सहभागी होतात. या दिंडी सोहळ्याला आपले कुटुंबच मानून त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे गाढवे अण्णा हे सर्व दिंडीतील लोकांचे श्रद्धास्थान गुरुवर्य बनले आहेत.श्री क्षेत्र कासवंड ते पंढरपूर जाताना दापवडी,शेते, रामनगर, भिवडी, चिमणगाव, निढळ, गोंदवले, म्हसवड, पिलीव, भाळवणी, आणि नवमी ते बारस पर्यंत समस्थ वांगडे परिवार निवासस्थान सह्याद्री नगर पंढरपूर येथे मुक्कामी असते. हा दिंडी सोहळा संपन्न होत असताना प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदाते आपल्या कुटुंबाप्रमाणे वारकऱ्यांच्या अतोनात सेवा करत असतात वारकऱ्यांचा जिव्हाळा व प्रेम अतोनात दिसून येतो. वारकरी सांप्रदायातील लोक मनोभावी सेवा करत असतात. या सेवेमध्ये कासवंड सरपंच ह.भ. प. जनार्दन चोरमले महाराज ,ह. भ. प. सुरेश महाराज राजगे, बापू राजगे,नितिन चोरमले महाराज आणि परिसरातील सर्व वारकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!