शिवसेना पक्षाच्या वादळात जावळीतील झाडे स्तब्ध, मुख्यमंत्री एकनाथांच्या बरोबर जावलीतून एकटा एकनाथ जाणार का ???


शिंदे गटात सामिल होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निवडक शिवसेनेचे कार्यकर्ते बोलत असले तरी उद्धव ठाकरे निष्ठ शिवसैनिक असलेला, मुख्यमंत्री एकनाथांच्या बरोबर जावलीतून एकटा एकनाथ जाणार का ?
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – प्रतिनिधी मोहन जगताप,
सातारा.दि.०३.महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सक्षम असणार्या ठाणेस्थित पण मुळ जावळीची जन्मभूमि लाभलेल्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने राज्याच्या सत्ता बदलात शिंदे साहेबांच्या रूपाने जावलीसह महाबळेश्वर तालुक्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लाभल्याचे अंतर्मुख शिंदे गटाचे शिवसैनिक खुश असले तरी मूळ शिवसेनेचे शिवसैनिक मात्र स्थिर असल्याचे चित्र असून शिवसेनेच्या गटबाजीच्या वादळात जावली महाबळेश्वर मधील शिवसेनेची झाडे स्तब्ध असून याठिकाणी पान ही हालले नसल्याचे बोलले जात आहे.
जावळीच्या शिवसेनेच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माज़ी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या पासून सुरू झालेल्या कारकीर्दीचा आढाव्या सोबत आज जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले एकनाथ ओंबळे यांच्या रूपाने भरीव कार्य करणाऱ्या एकनाथांच्या भेटीस ऐकटा एकनाथ जाणार का ? अशी जनमानसात चर्चा आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकीय इतिहास पाहता जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण ,आनंदराव चव्हाण, प्रमिलाताई चव्हाण यांच्या लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी जावलीकरानी आपले ऐकी अनेकदा दाखवून दिली. त्याच वेळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणार्या त्याच जावळीच्या राजकीय इतिहासात १९९५ साली जावलीकरांच्या एकजुटीने या जावली महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन आमदार गेनुजी गोविंद कदम यांचा पराभव करून मुंबईस्थित शिवसेना कार्यकर्ते असणार्या व वेळेप्रमाणे तालुक्याचे मुख्य ठिकाणी राजकारणात रस घेवून समाजसेवा करणार्या मुंबईत टॅक्सी वाहक असणार्या सदाशिव सपकाळ यांच्या रूपाने नवे नेतृत्व जावली विधानसभा मतदार संघात पश्चिम महाराष्ट्रातील पहिला आमदार म्हणून निवडून दिले, त्यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा वरदहस्त असल्याने ” न भूतो न भविष्य “अशा पद्धतीने विकासगंगा जावळी तालुक्यातील विकासात्मक कार्य झाल्यामुळे प्रत्येकाला सदाशिव सपकाळ आमदार असले तरी मीच आमदार असल्याचे जाणवत होते. त्यावेळचे कोणतेही अधिकारी सपकाळ यांच्या नावाने सर्व गावागावातून विकासात्मक कामासाठी धडपडत होते. त्यातून शेकडो कोटींचा विकासात्मक पाया रोवून जावली तालुक्यातील विकासात्मक परीवर्तन पाहता जावली पंचायत समितीवर पहिले सभापती म्हणून वसंतराव मांनकुमरे सह जिल्हा परिषदेच्या सभागृहात मच्छिंद्रनाथ क्षीरसागर, कै. विठ्ठलदादा पवार , सौ.कविता मोहन जगताप,कै.तानाजी धुमाळ यांच्या रूपाने १९९७ ते पुढच्या कालावधीत शिवसेनेच्या रूपाने झंझावात निर्माण केला.
या कालावधीत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार म्हणून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यात आल्याची नोंद घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची घोडदौड आज ही या कालावधीतील विकास कामामुळेच असल्याचे मत सर्वसामान्य जनता करीत आहे. त्या नंतरच्या १०/१२ वर्षांच्या राजकीय कालावधीत अनेक राजकिय मुंबईस्थित समाजसेवी म्हणून आलेल्या राजकीय टोळीच्या माध्यमातुन आर्थिक निकषांवर निवडून असलेल्यांच्या यादीने खरे समाजहित जोपासणारे बाजूला जावून आर्थिक हितसंबंधांचे राजकीय राजकारण्यांनी ह्या मतदान संघावर आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसत आहे.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मिळालेल्या या शिवसेनेच्या मातब्बर लढवय्या नेते मंडळी यांच्या पुढे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्यापुढे धनाढ्य राजकीय वरदहस्त लाभलेल्या मतदान संघात शिवसेनेतील फुटीरतावादी लोकांच्या एकांगी स्वभावधर्मामुळे शिवसेनेची वाताहात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले मात्र मूळ शिवसैनिक यांनी ” एकला चलो रे ” प्रमाणे आपल्या शिवसेनेचाच भगवा हाती घेवून ग्रामपंचायतीच्या पासून नगर पंचायत पर्यंत मजल दरमजल करीत मुळ शिवसेनेच्या अस्तित्वात भर पाडण्याचे प्रयत्न केले गयाराम पुन्हा आयाराम झाले.
मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्री मंडळातील एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तालुक्यातील विकासात्मक कार्यातून अनेक जणांना कामे करण्याची संधी मिळाली असली तरी मूळ शिवसेनेचे असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतच राहण्यास पसंती व्यक्त केली असून महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी हे शिंदेंना पाठींबा देत असले तरी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मायभूमितील शिवसैनिक मात्र एकला चलोच्या भूमिकेत दिसण पसंत करीत आहेत.
एकीकडे एकनाथ ओंबळे हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील व एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील जावलीकर म्हणून शिंदे गटात सामिल होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निवडक शिवसेनेचे कार्यकर्ते बोलत असले तरी आम्ही उद्धव ठाकरे निष्ठ शिवसैनिक असल्याचे मुळ शिव सैनिक सांगत असून मुख्यमंत्री एकनाथांच्या बरोबर एकटा एकनाथ जाणार का ? असा जावली तालुक्यातील शिवसैनिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.



