महाराष्ट्रसातारासामाजिक

एका रात्रीतल्या सरावात भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी यांनी सातार्‍यातील दहीहंडी फोडण्यात यश

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- सुनिल धनावडे

मेढा. दि.२३. भैरवनाथ गोविंदा पथक जवळवाडी यांनी सातार्‍यातील दहीहंडी फोडून आपला दबदबा कायम ठेवला आहे.एका रात्रीतल्या सरावात रचले ६ थर
जावळीच्या राजधानी शेजारी असलेलं एकीचं बळ समजलं जाणारं जवळवाडी गावं. सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव साजरा करीत असलेले जवळवाडी ता.जावली गाव.या गावातील भैरवनाथ गोविंदा पथकाने सातार्‍यातील श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मित्र मंडळाची दहीहंडी सहा थर रचत १,७७,७७७ रूपयांची बक्षिसासह फोडून गेल्या दहा-पंधरा वर्षातील सातारा जिल्ह्यातील गोविंदा क्षेत्रातील आपले स्थान अबाधित राखले आहे.
जावली तालुक्यातील जिद्दी,साहसी,चिकाटी आणि एकजुट अशी ख्याती असलेल्या जवळवाडी गावातील भैरवनाथ गोविंदा पथक हे नावाजलेले असून या पुर्वी सातारा जिल्ह्यात सातारा,कोरेगाव येथे आयोजित केलेल्या दहीहंडी सात थर रचत फोडून ग्रामीण भागात ईतिहास रचला होता.
यावर्षी कोणत्याही स्पर्धेत उतरण्याची कसलीही तयारी नव्हती. गावातील अनेक युवक रोजी रोटी साठी मुंबई व ईतर शहरात आहेत. गावातही सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्याने कोणताही सराव नव्हता. पण श्रीमंत छ.खा.उदयनराजे भोसले मित्र मंडळाने सातारा येथे दहीहंडीची मोठी स्पर्धा भरवल्याने जवळवाडीत असणार्‍या युवकांच्या मनात उर्जा निर्माण झाली.२० ऑगस्ट रोजी अगदी मुठभर शिलेदार एकत्र आले आणि मग रात्री १०वाजता सुरू झाला सराव.रात्री १ वा.पर्यंत सराव करून दुसर्‍याच दिवशी श्री भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होवून,श्री गणरायाचा आशिर्वाद घेवून तालीम संघावर हे गोविंदा पथक दाखल झाले ते जिंकण्याच्या आशेनेचं.
गावातील जेष्ठ ग्रामस्थ मिळेल त्या वहानाने सातार्‍यात अक्षरशा पावसात भिजत पोहचले.पहीलीच पाच थरांची न डगमगता सलामी देवून सातारकरांची मने जिंकली.सातारकरांनाही इतका आत्मविश्वास होता की प्रत्येकाच्या मुखात एकच नाव होते जवळवाडी गोविंदा पथकच दहीहंडी फोडणार हाच विश्वास सार्थकी ठरवत अवघ्या ९० सेकंदात सहा थर रचत पुन्हा एकदा याच मैदानावर जवळवाडी गोविंदा पथकाने ईतिहास घडविला.विजया नंतर जवळवाडीकरांनी एकच जल्लोष केला.सातार्‍यातून मेढ्यात येताच ढोल-ताशा व फटाक्यांच्या कडकडाटात गोविंदा पथकाचे स्वागत करण्यात आले.जवळवाडी गावात या विजयीवीरांच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या माता-भगिनींनी औक्षण करून या गोविंदा पथकाचे गावात जल्लोषात स्वागत केले.मिळालेले बक्षिस ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या चरणी अर्पण करून सर्व जवळवाडीकर स्थिरावले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!