
वाढदिवसाच्या दिवशी साहेबांची आयुष्यातून एक्झीट …..
केळघर.दि.२०.जावळी तालुक्यातील वरोशी गावचे सुपुत्र बोंडारवाडी धरण समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचे हृदयाचे तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले.
आज रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी त्यांचा वाढदिवसाचा केक कापत असतानाच त्यांचे सहकारी, जावळी तालुक्यातील काही निवडक मित्रांच्या समोरच ही दुर्दैवी घटना हृदयाचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विजयराव मोकाशी गेली अनेक वर्ष जावलीतील सामान्य जनतेला हक्काचे पाणी मिळावे यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्याचे स्वप्न पाहणारे मोकाशी साहेब, आज सर्वांच्या डोळ्यात पाणी आणून सर्वांना सोडून निघून गेले आहेत. जावळी तालुक्यातील ५४ गावातील शेतकर्यांच्या शेतीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी जावळी तालुक्यातील ५४ गावच्या लाखों लोकांना एकत्रित करून, “पाणी हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच” असा हुंकार देत एकीची वज्रमूठ तयार करून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थी भावनेने शासनदरबारी पाठपुरावा करत व प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून समाजासाठी लढा देणारे एक संवेदनशील व्यक्तीमत्त्व होते.
सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रात्री असे काही होईल असे कोणाच्या स्वप्नातही वाटले नसेल,जावलीतील एक समाजसेवक हरपला खूपच दुर्दैवी घटना आहे.
आपला हा मनुष्य जन्म हा समाजाचं काहीतरी देणं लागतो या पवित्र,निस्वार्थी भावनेतून जावळी तालुक्याचा विकास व्हावा मेढा-केळघर विभागातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून आपला जावली तालुका सुजलाम सुफलाम होऊन, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही पवित्र भावना उराशी बाळगून बोंडारवाडी धरण कृती समिती स्थापन करून गेली अनेक वर्ष बोंडारवाडी धरण प्रकल्प होण्यासाठी लढा देत होते अशा संयमी नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.




