केडांबे ता.जावली येथे शहिद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी २६ नोव्हेंबर रोजी स्मारकाचे होणार भूमिपूजन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज– युवराज धुमाळ
मुंबई.दि.१२ २६/११/२००८ ची घटना संपूर्ण जगात कायदा सुव्यवस्थेला हरवणारी होती यातच पाकिस्तान वरून देशावर हल्ला करण्यासाठी आलेला अजमल कसाब याला जिवंत पकडलेले जावळी तालुक्याचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक जावळी तालुक्यात होणार असल्याचे खात्रीलायक संकेत मिळाले आहेत येत्या २६/११/२०२२ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती त्यांचे बंधू शिंदे सरकार गटाचे जावळी तालुक्याचे नेते एकनाथजी ओंबळे यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रेखांकन अहवाल सादर केल्यानंतर मंत्रालयीन सूचने चा माहितीनुसार येत्या 26 नोव्हेंबरला जिल्हयाचे पालकमंत्री शहिद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी येऊन स्मारकाचे भूमिपूजन करणार असल्याचेही एकनाथ ओंबळे एका प्रसिद्ध पत्रकार नमूद करून माहिती दिली आहे 26/11 ची घटना होऊन 14 वर्षे झाली आता 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर जावळी तालुक्यात जावळीचा वाघ म्हणून झडप घेऊन अजमल कसाब या अतिरेक्याला पकडणारे तुकाराम ओंबळे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यस्मारक होणार असेही एकनाथजी ओंबळे म्हणाले राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री मा. शंभुराज देसाई यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली व त्यांना या संदर्भातले निवेदन ही स्मरण पत्र म्हणून सादर केल्यानंतर व या भेटीत शाहिद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी त्यांनी तात्काळ संबंधित अधिका-यांना आठ दिवसाच्या आराखडा सादर करण्याचे आदेश देऊन येत्या २६ नोव्हेंबर रोजी मी स्वतः येऊन भुमिपुजन करणार आहे असे आश्वासन दिले.दिड दोन महिन्यापुर्वीच मुख्यमंत्र्यांना स्मारकासंदर्भात निवेदन दिलेले व मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार मा प्रांत व तहसिलदार यांच्या उपस्थितीत चार बैठका झाल्या व आराखड्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. शहिद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक अतिशय भव्य व देखणे झाले पाहिजे अशा सुचना सर्व अधिकाऱ्यांना देऊन स्मारकासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.


शहिद तुकाराम ओंबळेंमुळेच कसाब जिवंत सापडू शकला व पाकिस्तानचे पितळ उघडे पडले.तुकारामओंबळेंच्या ह्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना २००९च्या प्रजासत्ताक दिनी ‘अशोकचक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्यांनी असे प्रशंसोद्गार काढले,की “कोणत्याही शस्त्राविना दहशतवाद्यांवर तुटून पडणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय शौर्याला माझा सलाम आहे.”



