महाराष्ट्रसातारासामाजिक

नाभिक महामंडळ सातारा जिल्हा रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मेढा.दि.१४ महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा ओबीसी संघटना तसेच बारा बलुतेदार महासंघ यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन जिल्हाधिकारीकार्यालयासमोर केले.

             यावेळी जेष्ठ नेते  भाऊ दळवी , बापूराव काशिद, नगरसेवक श्रीकांत आंबेकर ,ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने,ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संजय परदेशी प्रमोद क्षिरसागर , कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भानुदास वास्के, संतोष साळुंखे, चंद्रकांत जगताप आदी उपस्थित होते
यावेळी संपतराव पवारविठ्ठल महाराज गायकवाड व दशरथ महाराज जाधव यांनी सांगीतले की केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरा समोर प्रखर आंदोलन करण्यात येईल .

यावेळी दानवे विरोधात जोरदार घोषणा कार्याध्यक्ष अंबादास दळवी किशोर काशिद, जीवन मसुरकर, प्रकाश वास्के, महेश जाधव, राजू निकम, अजय काशिद , पांडूरंग राऊत, रमेश पवार, भरत झेंडे, श्रीनिवास जाधव, अशोक पवार यांनी दिल्या . तर दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारून माजी नगरसेवक रणजीत साळुंखे शहराध्यक्ष योगेश साळुंखे , निलेश साळुंखे, संदीप काशिद नितीन साळुंखे, गिरीधर यादव, अरुण खरे दिपक घाटगे, विठुल जाधव, दिलीप साळुंखे ,सुनिल झेंडे, पप्पूशेठ पाडळी यांनी निषेध केला . यावेळी दानवेच्या विरोधात जोरदार निर्देशने केली .
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले  त्यामध्ये म्हटले आहे की राजकीय भाषणे देतांना यांना बहुजन समाजाला उद्देशुन भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दाणवेच्या जहांगीर नाहीत. दानवे यानी बहुजन समुहातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे.यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आपन त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहिर माफी मागावी असे निवेदन या अगोदर सुद्धा दिले होते . मात्र आज संपूर्ण राज्यभरात नाभिक समाजासह बहुजन समाजातील बरेच जात समुहांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली व जिल्हाधिकारी मार्फ़त आपणास निवेदन देत आहोत. जर येत्या ८ दिवसाच्या आत समाजाची माफी मागितली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी लाखोंच्या संख्येने राज्यातील नाभिक समाज गोळा होणार व त्यांच्या घरासमोर केस मुंडन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!