18 नागरी सुविधा पूर्ततेसाठी सी.ई.ओ यांनी घेतली १०५ गावातील सरपंच आणि नागरिकांची बैठक
स्टार ११महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —-
तापोळा. दि.०५. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज माननीय श्री ज्ञानेश्वर खिल्लारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत आज तापोळा येथे 105 गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि नागरिक यांची बैठक संपन्न झाली.
शिवसेना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे विकासासाठी कामाची मागणी केली त्यानुसार आजची बैठक प्रशासनाने आयोजित केली होती. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जाईल याची माहिती दिली. 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे सांगून विविध समित्या तयार करून गाव पातळीवर सर्वेक्षण केले जाईल.कामांची आवश्यकता पाहून प्रस्ताव स्वीकारले जातील,ही प्रक्रिया 8 दिवसात पूर्ण केली जाईल याच्या सूचना संबंधिताना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.
अनेक वर्षानंतर प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिक यांची संवाद बैठक झाली.पाणी,रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण, पशुवैद्यकीय दवाखाना,वनविभाग,नेटवर्क अशा विविध प्रकारच्या समस्या श्री बजरंग सकपाळ,श्री धोंडिबा महाराज,श्री सुभाष सोडकर,श्री समीर चव्हाण,श्री मंगेश सकपाळ,श्री साळुंखे गुरुजी,इ कडून मांडण्यात आल्या.प्रशासनाने लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.तर ही महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री महोदयांनी योजनांचे आदेश दिले त्याबद्दल साहेबांना लोकांनी खूप धन्यवाद दिले.
मुख्यमंत्री महोदय महाबळेश्वर जावली तालुक्यातील गावांसाठी विकास कामे सुरू करत आहेत याचे समाधान आणि साहेब आपले आहेत याचा आनंद प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यावेळी 105 गावातील सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक १०५ गाव समाजाचे सचिव श्री गणेश उतेकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री संजय संकपाळ गुरुजी तर आभार श्री विशाल सकपाळ यांनी मानले.या बैठकीच्या यशस्वीतेसाठी श्री विशाल सकपाळ, श्री संजय शेलार तालुकाप्रमुख, श्री रमेश धनावडे सरपंच तापोळा, श्री अजित सकपाळ, श्री गणेश उतेकर, श्री राम सकपाळ, श्री नितीन गायकवाड, श्री शंकर कदम,श्री आनंद धनावडे, श्री तुकाराम धनावडे इ तरुण कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.