स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ———
सातारा दि. 10 (जिमाका). क्रीडांगण विकास अनुदान योजचनेंतर्गत क्रीडांगणावर विविध सुविधा, विकसित व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत व्यायामशाळा इमारत बांधकाम व खुली/व्यायामशाळा साहित्य पुरवठा करण्याकरिता रक्कम सात लाख रुपयांचे अनुदान जिल्हा वार्षीक योजना व सहाय्यक आयुक्त, समा कल्याण विभागमधून मंजूर करण्यात येते.
तरी सातारा जिल्ह्यातील विविध शाळा/महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी मंजुरीकरिता आपले विहित नमन्यातील परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतित दिनांक 21 जुलै, 2023 पर्यंत क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, यांनी केले आहे.