स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —-अजित जगताप
सातारा दि०३. सातारा नगरपालिका हद्द वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांना नागरी सुविधा उपलब्ध व्हावी अशी माफक अपेक्षा आहे. परंतु, सध्या निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदार शाहूपुरी मध्ये रस्त्याचे काम करताना पुनर्दुरुस्तीची अगोदर आखणी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रस्त्याची किमान भ्रष्ट नव्हे पण एका तरी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुधारणा करावी. अशी मापक अपेक्षा शिवसेना युवा शहर संघटक प्रणव सावंत व गडकरअळी ग्रामस्थांनी केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की सातारा शहर नजीक असलेल्या शाहूपुरी ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली .या ठिकाणी शहराच्या कारभारामध्ये सहभाग घेणारे अनेक राजकीय मंडळी या शाहूपुरी मध्ये राहतात. आता हा परिसर हद्द वाढीमुळे सातारा नगर पालिकेमध्ये समाविष्ट झालेले आहे. हे आता काही ठेकेदारांसाठी सुवर्णसंधी ठरू लागलेली आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अशा या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. या ठिकाणी उत्कृष्ट रित्या रस्ता करणे गरजेचे आहे .किमान दोन ते तीन वर्षे तरी हा रस्ता टिकावा. या अपेक्षेने निविदा काढली जाते पण टक्केवारीच्या मुळे हा रस्ता निकृष्ट करण्याची स्पर्धा लागलेली आहे .त्याचे कारण असे की, पुनर्दुरुस्तीमध्ये आर्थिक लाभ होतो. थोडक्यात मुद्दल बुडली तरी चालेल पण नियमित व्याज मिळाले पाहिजे. असा विचार काही महाभाग करत आहेत. आणि त्याचाच नेमका फटका या गडकर आळीतील वाहन चालकांना बसत आहे.
याबाबत दबावाखाली कुणी आवाज उठवत नसल्याने शिवसेना युवा शहर संघटक व ग्रामस्थांनी स्वतः जागेवर जाऊन या रस्त्याची पाहणी केली . अनेक सेवानिवृत्त अभियंता व अधिकारी यांनी सांगितले की, मुळात हा रस्ता अशा पद्धतीने कसा काय झालेला आहे ? जर निविदा काढताना ह्या रस्त्याचा जर डांबरीकरण करायचे असेल तर जुना रस्ता पुन्हा उकडून त्याकडे खडीकरण व रोलर मारून डांबरीकरण आणि त्याच्यानंतर पुन्हा बारीक खडीकरण करून हा रस्ता कायमस्वरूपी केला जातो. ही कामाची पद्धत आहे. पण ,पण अलीकडच्या काळात पैसा फेको निकृष्ट रस्ता देखो ,,,,,असे नवीन म्हणी शाहूपुरीकर मोठ्या जिद्दीने अनुभवत आहेत. याबाबत आता गुणवत्ता नियंत्रक व संबंधित नगर विकास खात्याकडे लेखी तक्रार करून या रस्त्याबाबत तक्रार करणार असल्याचे काहींनी नमूद केले आहे.
दरम्यान, याबाबत संबधित काही लोकांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू मांडता आली नाही. त्यांनी कोणाची ही टकक्यांपर्यंत वाट न पाहता चांगले काम करून दाखवावे. त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे असे ही नमूद केले आहे.