सातारासामाजिक

उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन प्रा.डॉ.प्रमोद घाटगे यांना केले सन्मानित

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

मेढा.दि.१०. जावली तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसरअसणारी संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली यांच्यावतीने सन 2023 साठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे हुमगाव तालुका जावली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रघुनाथराव घाटगे यांना त्यांच्या 31 वर्षाच्या शिक्षण सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या महाविद्यालयात आज तालुक्यातील सुमारे 40 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत डॉ. प्रमोद घाटगे सरांनी यावेळी माझ्या कार्याची दखल घेऊन आपण दिलेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा असून मी सदैव ऋणी राहील आणि मित्रमेळा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास सहकार्य करीत राहील हा सन्मान माझा नसून माझे कुटुंबीय, माझे गुरुवर्य, जयवंत प्रतिष्ठान संस्था आणि हुमगाव गावचा गौरव आहे असे प्रतिपादन केले.

 

जावली तालुक्यात जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय उभे करून डॉ. प्रमोद घाडगे सरांनी जावलीतील उच्च शिक्षणाचा खूप मोठा शैक्षणिक प्रश्न सोडवला बारावीचे एच एस सी बोर्ड परीक्षा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल प्राचार्य प्रमोद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व शैक्षणिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची उपलब्धता या महाविद्यालयाने केली आहे.

यावेळी माननीय आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सिने अभिनेता विजय निकम, चंद्रकांत कांबीरे, विशाल बांदल, महिगावकर, एकनाथ ओंबळे आदींनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या मित्रमेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार सचिव निलेश धनवडे यांनी स्वागत केले अनुप लकडे यांनी प्रास्ताविक केले अमित लकेरी यांनी आभार मानले

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!