जिल्हाधिकारी सातारासातारा
विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-
सातारा दि. 30 : विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर कालावधीत जिल्ह्यातील 22 गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनतेला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा कामकाजाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा संतोष हराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे, विविध जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विविध तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले संकल्प यात्रेचे कार्यक्रम 11 तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींमध्ये घेण्यात येत आहेत. विविध योजनांची माहिती सांगणारे चित्ररथ गावांमधे जनजागृती करत आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात आरोग्य शिबीर, विविध दाखल्यांचे वाटप करा. यासाठी लाभार्थ्यांची निवड करुन कागदपत्रांची पुर्तता करुन घ्या. लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची माहिती, व्हिडीओ पोर्टलला अपलोड करा. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील योजनांची माहिती पोर्टलला भरण्यात येईल याची दक्षता घ्या.
आयुष्यमान भारत योजना राबविण्यात आपण अग्रेसर होतो. या कामाला पुन्हा गती देण्याची गरज आहे. याला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला बचत गटांची मदत घ्यावी. असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी सांगितले.