
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-
मेढा.दि.०९.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन-२३-२४ या वर्षात “७५ व्या अमृतमहोत्सवी” वर्ष म्हणून साजरे करताना बॅकेचे संचालक मंडळ आदरणीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब , व श्री. राजेंद्र राजपुरे, साहेब ,संचालक आणि श्री. ज्ञानदेवजी रांजणे, साहेब संचालक व प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जावली व महाबळेश्वर तालुक्यातील सर्व सेवक यांचे व त्यांचे कुटुंबीय आणि विकास सोसायट्याचे सचिव यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी
” धन्वंतरी डायबेटिस सेंटर , सातारा डॉ. ओंकार पाटील व श्री. ऋषिकेश जाधव समन्वयक यांचे मदतीने ७० व्यक्ती यांची तपासणी, डायबेटिस व ब्लड प्रेशर तपासणी आणि ई.सी.जी तसेच आवश्यक ती शारीरिक तपासणी करण्यात आली.
याशिवाय माऊली ब्लड बँक, सातारा डॉ. गिरीश पेंढारकर व त्यांचे सहकारी यांचे वतीने रक्तदान शिबीरामध्ये बॅक सेवक व तालुक्यातील रक्तदाते यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ” दानात दान रक्तदान” करावे म्हणून ५० लोकांनी रक्तदान केले.
यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी डॉ. ओंकार पाटील यांचे स्वागत केले व आभार मानले.
तसेच रक्तदान शिबिरामध्ये डॉ. गिरीश पेंढारकर यांचे स्वागत व आभार श्री. अण्णासाहेब फरांदे, विभागीय विकास अधिकारी, जावली विभाग मेढा यांनी केले.
या प्रसंगी मा.श्री. राजेंद्र भिलारे साहेब, सरव्यवस्थापक, कर्जे व विकास,श्री. भानुदास भंडारे साहेब, उपव्यवस्थापक, शेती कर्ज, अल्प मुदत, श्री. उध्दवराव देशमुख साहेब, उपव्यवस्थापक, फिरते पथक तथा संपर्क अधिकारी, जावली/ महाबळेश्वर, श्री. प्रविण निकम साहेब, उपव्यवस्थापक, हिशोब विभाग, श्री. जयवंतराव पवार, उपव्यवस्थापक, प्रापर्टि विभाग, श्री. प्रशांत देशमुख, उपव्यवस्थापक, आय.टी. विभाग,श्री. राजेंद्र निकम, विभागीय विकास अधिकारी, महाबळेश्वर विभाग, तसेच श्री. संजय निकम,श्री. प्रकाश झोरे,श्री. गजानन राजपुरे, श्री. नारायण जाधव, श्री. दत्तात्रय दुर्गावळे, श्री. दिपक पार्टे, श्री. अरुण खटावकर,श्री. संतोष देशमुख, श्री. सुर्यकांत चिकणे, श्री. सागर गुरव, श्री. मुख्तार शेख, श्री. शिरसाट,श्री. प्रविण धनावडे, श्री. अक्षय पवार,श्री. धनंजय महामुलकर, व दोन्ही तालुक्यातील सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ.सविता कदम शाखाप्रमुख व सौ. वैशाली दळवी यांनी मानले.