स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——
मेढा,दि.०२.
जावली तालुक्यातील रेशन दुकानदार यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी रेशन दुकाने बंद बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले.जावली तालुका सर्व रेशन दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशांत रेशन दुकानदारांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. वेळोवेळी याबाबत राज्य व केंद्र शासन यांना मागण्यांची निवेदने देण्यात आलेली असून, याबाबत कोणतीही दखल राज्य अगर केंद्र शासनाने घेतलेली नाही.
दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी दि. ०१/०१/२०२४ पासून संपूर्ण देशात व राज्यात रेशन दुकाने बेमुदत बंद राहणार आहेत. ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशन, नवी दिल्ली ही देशव्यापी रेशन दुकानदार संघटनेशी संलग्न असणारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य व केरोसीन परवाना धारक महासंघ, पुणे यांचे आदेशानुसार जावली तालुक्यातील सर्व रेशन दुकाने या बंद मध्ये सहभागी होणार आहेत. या राज्य संघटनेशी सातारा जिल्हा जावली तालुका संघटना संलग्न आहेत.
या बंद काळात धान्य वाटप बंद, पॉश मशिन बंद, दुकान बंद असे आंदोलनाचे स्वरुप राहणार आहे. दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सातारा येथील आपल्या कार्यालयात ११ तालुक्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांचे या बंद संदर्भात मिटींग बोलविली होती. यावेळेस आपणांस बंद बाबत पूर्व माहिती दिलेली आहे. यावेळेस आपण केलेल्या सूचनेनुसार जानेवारी २०२४ या महिन्याचे धान्य सर्व दुकानदारांनी डिसेंबर २०२३ मध्ये मंजूर करुन धान्यही दुकानांमध्ये उतरवून घेतले आहे. याप्रमाणे आम्ही प्रशासनाला सहकार्य करीत आहोत.
तरी या बंद काळामध्ये तालुक्यातील जिल्हयातील कोणाही दुकानदारांवर कोणतीही कारवाई आपल्याकडून अथवा तहसिल कार्यालयाकडून होवू नये. याबाबत आपण संबंधितांना सूचित करावे. प्रशासनाकडूनही आम्हांस सहकार्य मिळावे असे आवाहन जावली तालुक्यातील रेशन दुकानदार यांनी केले आहे.