स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— प्रतिनिधी:संजय वांगडे
सातारा.दि.२०. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे मेजर डॉक्टर राहुल खाडे यांची अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक पदी पदोन्नतीने नेमणूक झालेली आहे.
याआधी मेजर डॉक्टर खाडे यांनी भारतीय सेनेच्या आर्मी मेडिकल कोर मध्ये 5 वर्ष देशसेवा केली आहे नंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथेही प्रशिक्षण केंद्र सातारा येथेही काम केलेले आहे. व त्यांनी न्याय वैदक व विषशस्त्रा या विषयात बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथून एम डी केली असून या विषयात ते गोल्ड मेडल धारक आहेत तसेच त्यांना शव विच्छेदन च प्रदीर्घ अनुभव आहे.गेली 6 वर्षे ते सामान्य रुग्णालय सातारा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णसेवा केली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे समाजातील विविध मान्यवरणी व आरोग्य विभागातील विविध संघटनाच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.