स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
तापोळा.दि.३१ सेवा ही माणसाचा स्वाभाविक वृत्ती. हीच वृत्ती ज्या गुरुजींच्या कामाचा आधार बनली. अशी उल्लेखनीय कामगिरी करून ३८ वर्ष ५ महिने एवढी प्रदीर्घ शैक्षणिक सेवा करत 31 मार्च 2024 रोजी. वयतमानाने सेवानिवृत्त झाले आहे.
सेवापूर्ती समारंभ त्याच्या मूळ गावी मौजे वेळापूर येथे मोठ्या उपस्थित संपन्न झाला. या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन श्री किरण यादव सर, बँकेचे माजी चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघटनेचे राज्याध्यक्ष श्री सिध्देश्वर पुस्तके, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे नेते श्री दीपक बापू भुजबळ, शिक्षक बँकेचे संचालक श्री संजय संकपाळ, महाबळेश्वर तालुका गटशिक्षणाधिकारी आदरणीय आनंद पळसे साहेब, शिवसेना नेते श्री एकनाथ सकपाळ, श्री गणेश उतेकर, श्री धोंडिबा धनावडे, श्री राम सकपाळ सरपंच, श्री आनंद धनावडे, श्री दिलीप जाधव माजी केंद्रप्रमुख अनेक आजी माजी शिक्षक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,बदली हुन परगावी गेलेले शिक्षक , आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, अशी मोठी उपस्थिती होती.
चेअरमन किरण यादव यांनी गुरुजींचे दुर्गम भागात केलेल्या कामाचे कौतुक केले.. तापोळा विभागात सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिकली पाहिजेत यासाठी सरांनी दिलेले योगदान मोठे आहे. असे प्रतिपादन प्रशासकीय अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी पळसे साहेब यांनी केले.महादेव गुरुजी यांनी आपल्या सेवेची सुरुवात आपल्या गावी म्हणजे वेळापूर गावी १९८५ साली केली. वेळापूर, गावढोशी, वाळणे, वानवली आहिरे, सौंदरी, आवळण, आणि शेवटी पुन्हा गावढोशी या शाळेवर झाली. रंगकाम, शैक्षणिक साहित्य निर्मिती ची त्यांना मोठी आवड होती. हार्मोनियम वादन यामुळे ते विद्यार्थी प्रिय होते.
महादेब गुरुजी खरोशी केंद्रात सेवा करत असल्याने खरोशी केंद्राचे श्री चंदर सकपाळ आणि केंद्रसंचालक दीपक कदम सर आणि केंद्रातील सर्व शिक्षक यांनी सरांना भेटवस्तू पोशाख देऊन सत्कार केला.सकपाळ गुरुजी यांनी सेवापूर्ती कार्यक्रमात ज्या शाळेत त्यांनी सेवा केली त्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय संकपाळ संचालक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सकपाळ गुरुजी यांचे कुटूंबीय, श्री चंदर सकपाळ, श्री आनंद सकपाळ श्री शाम चोरगे श्री प्रकाश सकपाळ श्री बाळकृष्ण कदम सर यांनी विशेष लक्ष दिले. श्री प्रकाश गुरुजी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.