स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा.दि.०४. सातारा जिल्हा परिषद, सातारा (कृषी विभाग) व पंचायत समिती जावली ( मेढा)( कृषी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रक सन २०२४-२५ अंतर्गत जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या खालील योजना नियोजन विभागाकडील शासन निर्णय दि. ५/१२/२०१६ नुसार थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने राबविण्यात येणार आहेत.
सदर योजनांतर्गत निवड होणाऱ्या शेतकऱ्यांना विहीत तांत्रिक निकष /दर्जा असणाऱ्या बार्बीसाठी अनुदान देय राहणार असून या आवाहनाद्वारे खालील काही साहित्यांसाठी ऑनलाइन तर काही साहित्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने इच्छुक व गरजू शेतकऱ्यांचे मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत. काही अर्ज ऑफलाइन पद्धतीने व काही ऑनलाईन पद्धतीने इच्छुक व गरजू शेतकऱ्यांचे मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेकडे सन २४/२५ या वर्षीकरिता उपलब्ध अनुदानाच्या साहित्याचे नाव पुढील प्रमाणे आहेत –
कॅनव्हास/एचडीपीई ताडपत्री ,ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह, बॅटरी स्प्रेपंप ,बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप ,सायकल कोळपे,५ किंवा ७.५ एचपी विद्युत पंपसंच ,३ एचपी विद्युत पंपसंच ,४ किंवा ५ एचपी डिझेल इंजिन ,एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप,मधपेट्यांसाठी अनुदान देणे ,२ एचपी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र (विद्युत मोटारीसह) ,ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर ,कृषी यांत्रिकीकरण पल्टी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र पॉवर विडर इ.
योजनांतर्गत लाभार्थी पात्रतेचे निकष व देय अनुदान मर्यादा तपशील: वरील योजनांसाठी अर्जदारांना अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे, साहित्यनिहाय जि. प. मार्फत दिले जाणारे अनुदान इ. बाबतचा तपशील सातारा जिल्हा परिषदेच्या www.zpsatara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत दि..३१ ऑगष्ट , २०२४ पर्यत असलेने जावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मागणी अर्जाची ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीते नोंदणी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा याशनी नागराजन,कृषी विकास अधिकारी विजय माईनकर,कृषीअधिकारीअनिल काळे,गट विकास अधिकारी मनोज भोसले,कृषीअधिकारी डॉ.सत्यजित शिंदे,कृषी विस्तार अधिकारी हेमलता चव्हाण,कृषी विस्तारअधिकारी प्रशांत शिंदे यांनी केले आहे.
लाभार्थीची निवड :
लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास पंचायत समितीस्तरावर अर्जदारांची लॉटरी काढून प्राथम्यक्रमानुसार निवड केली जाईल.प्रवर्गनिहाय राखीव लक्षांकअ.जाती,अ.जमाती,दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित सूचनांप्रमाणे राखीव लक्षांक राहील.
काही बाबी करिता ऑनलाईन पध्दतीने खालील-
https://zpsatarascheme.com या लिंकच्या वेब पोर्टलद्वारे अर्ज करावेत.