
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा,जावली माण वाई सर्वसाधारण प्रवर्ग
सातारा दि.०७. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सभापती पदासाठी आरक्षण सोडत घेण्यात आली.त्यानुसार ११ पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडतीव्दारे प्रवर्गनिहाय निश्चीत करण्यात आले.

तपशील खालीलप्रमाणे.
खटाव पंचायत समिती- अनुसुचित जाती महिला प्रवर्ग,
फलटण पंचायत समिती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
कोरेगांव पंचायत समिती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
महाबळेश्वर पंचायत समिती- नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला),
खंडाळा पंचायत समिती- सर्वसाधारण महिला प्रवर्ग,
पाटण पंचायत समिती- सर्वसाधारण महिला प्रवर्ग,
कराड पंचायत समिती- सर्वसाधारण महिला प्रवर्ग,
जावली पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग,
वाई पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग,
माण पंचायत समिती- सर्वसाधारण प्रवर्ग
सातारा पंचायत समिती – सर्वसाधारण प्रवर्ग
या प्रमाणे पंचायत समिती सभापतींचे आरक्षण निश्चीत झाले आहे.




