स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
सातारा दि, १० (जि.मा.का.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सातारा येथील सैनिक स्कूलच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.