
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
मेढा. दि.१८.शरद पवार साहेब हे सर्वांचेच आदरणीय नेते आहेत. विचारात मतभेद असलेतरी ” राष्ट्रवादी ” हा पक्ष एकच असून पक्ष संघटना, विकासात्मक ध्येय धोरण ,तालुक्यातील प्रलंबीत असणारे प्रश्न व कार्यकत्यांना पाठबळ मिळवे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचाराबरोबर राहाण्याचा निर्णय माझ्या सह जावली -सातारा विधानसभा मतदार संघातील शरद पवार, अजित पवार, आ. शशिकांत शिंदे यांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या कार्यकत्यांनी घेतला असल्याचे सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती अमितदादा कदम यांनी मेढा येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहिर केले.

मेढा येथील शासकिय विश्राम गृहामध्ये प्रथम तालुक्यातील कार्यकत्यांची बैठक झाली . या बैठकिमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आ०ी त्या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमितदादा कदम यांनी त्याचा उहापोह केला.आपणा सर्वांचे दैवत शरद पवार यांनी मोठया संकटतातून राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानी संघटनांना एकत्र करून केली. अनेक संकटे आली तरी पक्ष सक्षम पणे राहीला. आजही राष्ट्रवादी संघटना एकच असून कार्यकत्यांच्या भावना आहेत त्या पक्षश्रेष्ठांना कळवणे माझं काम आहे. अजितदादांनी युती केली असली तरी ते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले नाहीत. सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विकासात्मक ताकद देण्याचाच ते प्रयत्न करत आहेत. दादांचे आणि माझे किती सख्य आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.
जावली तालुक्यातील सिंचनाचे रखडलेले जे प्रश्न आहेत .ते दादांच्या मागे पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. यामध्ये बोंडारवाडी धरणाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर महू . हातगेघर धरण ,कन्हेर, कोयना धरण पुनर्वसन , घाट माथ्याचे रस्ते या सारखे प्रश्न असतील ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आग्रह धरू. कोयना विभागातील सोळशीचे धरण मार्गी लागत असेल तर बोंडारवाडी चा विषय ज्यांनी सुरू केला त्यांनीच तो पूर्ण करावा अशीही दादांच्याकडे आग्रही मागणी राहील.जसं यशाच श्रेय घेतले जाते तसे अपयशाचीही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी स्विकारली पाहीजे .१० ते १५ वर्षात प्रलंबीत प्रश्न मार्गी लागत नाहीत . याच उत्तर कोणीतरी दिलं पाहीजे. असाही सवाल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित कदम यांनी केला.
राष्ट्रवादीचाच आमदार असेल…..
मेढा येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहिर केल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार असेल असे सुचित करून श्री . कदम पूढे म्हणाले , माझी काळजी करणारे अनेक हितचिंतक आहेत. आमच्या भूमिकेमुळे कुणाला आनंद होण्याच काहीच कारण नाही, शिवाय वृत्त पत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. वरती काहीही निर्णय झाला तरी जावली तालुक्यात लोकसभा ,विधानसभेसह सर्वच निवडणुका आ. शशिकांतजी शिंदे साहेबांना विचारात घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकतीने लढविणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.
मी ही आमदार पुत्र आहे. माझे वडील स्व.जी.जी.आण्णांनी या मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तर मीही पंचायत समिती ,जिल्हा परिषद, यांच्या माध्यमातून गांवागावात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी काँग्रेस व नंतर सलग २० वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जावलीतून माझ्या नावाची शिफारस विधान परिषदेसाठी अजितदादांकडे कार्यकत्यांनी केली आहे. आता जावलीकरांना स्थानिक उमेदवार पाहीजे आणि ती संधी आता आली आहे .मतदार संघ बदलल्यानंतर १५ वर्ष जावली बरोबरच महाबळेश्वर तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळाले नाही. स्थानिक स्वराज्य संस्था बरोबच , विधान सभेच्या निवडणूकी साठीच आमच्या सहकाऱ्यांची मोर्चे बांधणी सुरु असल्याचे यावेळी अमितदादा कदम यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी वेण्णामाई पतसंस्थेचे चेअरमन श्री सुरेश पार्टे, जावली बॅकेचे संचालक योगेश गोळे , प्रकाश कोकरे ,युवा नेते साधू चिकणे , राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रवि शेलार, विलास दुंदळे चेअरमन सुरेश दळवी ,मा.उपसरपंच प्रकाश कदम ,संदीप पवार , सोमनाथ कदम , महेश कदम , प्रमोद पवार ,विठ्ठल पवार , संतोष राजणे , रोहीत रोकडे, अशोक गोळे , विश्वास धनावडे भाईजान आतार सागर महिगाव ,सुंदर भालेराव , जय शिंदे ,शुभम महामुलकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थतित होते.