राजकीय

जावलीची उज्ज्वल शैक्षणिक पंरपरा कायम ठेवा…. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न.

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

मेढा .दि.. ५. शिष्यवृत्तीचा जावली पॅटर्न तयार करून जिल्ह्यात गुणवत्तेचा ठसा उमठवणारी जावलीची उज्ज्वल शैक्षणिक पंरपरा यापुढे कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. जावली शिक्षण विभागाच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी सभापती अरूणा शिर्के, कांतीभाई देशमुख, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष दत्ता पवार,गटविकास अधिकारी मनोज भोसले, डाएट चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, साहित्यीक निलेश महिगावकर, दत्तात्रय पार्टे, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंदकांत कर्णे, अरविंद दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, वर्षभर काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव वेळेवर होणे गरजेचे असते. त्यातून त्याना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळते.


    आदर्श शिक्षक विजयकुमार देशमुख यांना पुरस्कार प्रदान करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोबत अन्य मान्यवर.


            तालुक्यातील शाळांच्याभौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने रोडमॅप तयार करू. कोयना भूकंप मधून अनेक शाळांना निधी दिला आहे.जावळीच नाव जिल्ह्यात नावाजल गेलं पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया.

गुणवत्ता वाढविण्यासाठी व जावलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हवं ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी नेहमी सोबत आहे असे शेवटी त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात आजची शिक्षण व्यवस्था यावर निलेश महिगावकर यांचे व्याख्यानाने झाली. प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी जावलीच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडून जावलीची उज्ज्वल शैक्षणिक पंरपरा यापुढे कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचे ही भाषण झाले.
कार्यक्रमात तालुक्यातील ४१ शिक्षकांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा ओझरे, जिल्हा स्तरावर उत्कृष्ट परसबाग आदर्श शाळा म्हणून महू शाळा, स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील शाळा म्हणून सर्जापूर शाळा या तीन शाळांचा गौरव करण्यात आला.

आदर्श शिक्षकांमधून संदिप किर्वे व मनिषा शेलार यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक लकडे व योगिता मापारी यांनी केले तर आभार अरविंद दळवी यांनी मानले.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!