
स्टार ११ महाराष्ट्र न्युज —- प्रतिनिधी राजेश सोंडकर
महाबळेश्वर.दि.१०. कुंभरोशी विभागात आज मा. आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात जावली येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, कुंभरोशी ग्रामपंचायत ते प्रतापगड माची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, कुंभरोशी येथील नवे नगर आणि कुंभरोशी गाव येथील दोन अंगणवाडी इमारती, आणि कुंभरोशी येथील जननी माता मंदिर परिसरातील सुशोभिकरण (पेव्हर ब्लॉक) यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रवीण भिलारे, सुभाष कारंङे, आर्बन बँक नवनिर्वाचित सदस्य शरद बावळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुरेश सावंत, श्री रामवरदायिनी जंगल कामगार मजुर सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश आप्पा जाधव, रघु बावळेकर,शशिकांत उत्तेकर,समाजसेवक संदीप राउत,ग्रामसेवक चिटकुळ,जावळी सरपंच गणपत मोरे,जावळी,कुंभरोशी ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.