राजकीयसातारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभेसाठी अमित कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——

सातारा.दि.१९.   राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची जोरदार मागणी सातारा जिल्हा वासियांमधून होत आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी कदम यांनी मजबूत मोर्चे बांधणी केली असून सातार्‍यातून हक्काचा उमेदवार निवडून देण्याकरता कदम यांना तिकीट देण्यात यावे, अशी मागणी तमाम सातारावासियांमधून होत आहे.सुमारे अडीच दशके सातारा आणि जावलीच्या राजकारणात सक्रियरित्या भाग घेणारे अमित कदम हे तडफदार आणि आक्रमक व्यक्तिमत्व ओळखले जाते. जावलीच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी जावली सभापती या नात्याने आपला स्वतंत्र ठसा उमटवला. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष वाढीसाठी त्यांनी जोरदारपणे काम केले. मात्र 2023 मध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

जावली पंचायत समिती सभापती ते सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सभापती या दरम्यान कदम यांनी आपली मोठी राजकीय कारकीर्द घडवली.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सातारा जिल्ह्यात ओळखले जातात.अमित कदम यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.जावली तालुक्यामध्ये अमित कदम यांना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सातारा आणि जावळीच्या राजकारणामध्ये अमित कदम हे एक वेगळे स्थान ठेवून आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. त्यादृष्टीने सातारा आणि जावली मतदारसंघातून मजबूत मोर्चेबांधणीचा प्रयत्न करत अमित कदम यांनी सातारा लोकसभेच्या उमेदवारासाठी दावेदारी पेश केली आहे. अजितदादा गटाकडून सध्या अमित कदम यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची स्थापना सन १९९९ सालापासून सातारा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून अबाधित राखण्याचे काम सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.२०२४ च्या सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणुक महायुती गठबंधनच्या माध्यमातून हि परंपरागत जागा (उमेदवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला मिळावी.यामुळे अमितदादा कदम यांना सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी सातारा वासियांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!