श्री संत सेना महाराज नाभिक समाज संघटनेच्या वतीने आज जावली/महाबळेश्वर तालुक्यातील महिलांचा मेळावा
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
मेढा. दि. २१. जावळीची राजधानी मेढा येथे श्री संत सेना महाराज नाभिक समाज संघटना जावली व महाबळेश्वर तालुका ,महिला कार्यकारिणी जावली व महाबळेश्वर तालुका, रोटरी क्लब महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यामाने
जावली व महाबळेश्वर तालुक्यातील महिलांचा महीला मेळावा श्रावणी सोमवार दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. कलश मंगल कार्यालय मेढा येथे नाग पंचमी निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात श्री. संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मुर्तीस अभिषेक,नागपंचमी सणा निमित्त श्री नागदेवतेचे पूजन ,हळदी-कुंकू समारंभ ,मान्यवरांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार , महिला तालुका कार्यकरिणी सभा, नियुक्त प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम व अल्पोउपहार, चहापान कार्यक्रम होणार आहेत तसेच दुपारी १२.३० ते १.०० वा. नागेश साळुंखे आणि कंपनी. कर सल्लागार सातारा यांचे वतीने पॅन, आय. टी. रिटर्न चे महत्व, परिसंवाद होणार आहे १.०० ते २.०० वा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचा “बँक आपल्या दारी ” संकल्प अभियान परिसंवाद” होणार आहे.
दुपारी २.०० ते ४.०० वा. सर्वांसाठी “खेळ पैठणीचा” ही स्पर्धा. कै. एकनाथ भिकू शिर्के मा.अध्यक्ष श्री संत सेना महाराज नाभिक समाज संघटना जावली व महाबळेश्वर तालुका यांचे स्मरणार्थ पुरस्कृत : मा. श्री. वसंत एकनाथ शिर्के ( सरचिटणीस, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, शाखा सातारा जिल्हा)यांचे वतीने होणार आहे तसेच आदिती प्रस्तुत स्वरनाद एक सुरेल मैफीलीचा कार्यक्रम होणार आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.भारतीताई सोनवणे, अध्यक्षा, महिला महाराष्ट्र नाभिक महामंडळ, (महाराष्ट्र राज्य.).कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.किशोर (भाऊ) जगन्नाथ सुर्यवंशी, राज्य संपर्क प्रमुख महाराष्ट्र नाभिक महामंडळ, (महाराष्ट्र राज्य.) यांचे हस्ते होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहणेचे आवाहन श्री संत सेना महाराज समाज संघटना, जावली व महाबळेश्वर तालुका तर्फे वसंतराव शिर्के सरचिटणीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सातारा जिल्हा यांनी केले आहे.