सातारासामाजिक

मराठा आरक्षण समर्थनात मेढा येथे मोटारसायकल रॅलीचे आयोजन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

मेढा. दि.२६. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योध्दा श्री.मनोज जरांगे पाटिल यांच्या आमरण उपोषणाच्या नवीन भूमिके नंतर अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, साखळी उपोषण,आमरण उपोषण,रास्ता रोको, मोटरसायकल रॅली त्याचबरोबर विविध ठिकाणी शासन स्तरावर निवेदन देण्यासाठी जावली तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना मराठा समन्वयक व संयोजकांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

नका पहावू निमंत्रणाची वाट..
आरक्षणाची उजाडेल पहाट..!


जावळी तालुक्यात आजवर मराठा आरक्षणासाठी झालेल्या सर्वच उपक्रमात सर्व मराठा बांधवांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. आता गरज आहे की हा मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा एल्गार सुरू आहे त्याला पुन्हा एकदा जावळीतून बळ देण्याची. जेणेकरून आरक्षणाचा हा लढा पूर्णपणे यशस्वी होऊन आरक्षण मिळेल.यासाठी मराठा समन्वयक व तालुक्यातील विविध लोकांच्या झालेल्या चर्चेनुसार सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भैरवनाथ मंदिर मेढा येथीलआवारात सर्वजण एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवून आलेल्या सर्व बांधवांनी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व निवेदन देण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त युवक,महिला माता-भगिनी तसेच ज्येष्ठ मराठा बांधवांनी सहभागी होण्यासाठी संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यानच्या काळामध्ये सोमवार पर्यंत कुडाळ,मेढा,वेण्णा दक्षिण, केळघर,बामणोली व सायगाव विभागातील सर्व मराठा बांधवांनी आपापल्या विभागात मीटिंग घेऊन त्यांना सोमवारच्या या मोटरसायकल रॅली व मीटिंग संदर्भात माहिती द्यावी आणि आपल्या भागात जागृती करावी.
   सकल मराठा समाज,जावली

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!