
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि.०७.२५ महिलांना उषा कंपनी कडून शिलाई मशिन जावली तालुक्यातील श्रमिक जनता विकास संस्थेच्या माध्यमातून उषा शिलाई मशीन कंपनी, सिडबी बँक व अफार्म पुणे यांचे सहकार्याने जावली तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना शिलाई प्रशिक्षण शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन उषा शिलाई मशीन कंपनी चे भारताचे कॉर्डीनेटर श्री.अलोक शुक्ला यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले ग्रामिण भागातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी उषा कंपनी नेहमीच प्रयत्नशिल असून श्रमिक जनता विकास संस्थेमुळे आम्ही जावली तालुक्यात हा उपक्रम राबवित आहोत. गरीब व गरजू महिलांनी वेळ दिल्यास श्रमिक संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षम होतील.
जावली तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी मेढा येथिल श्रमिक संस्थेच्या कार्यालयात ९ दिवशीय निवासी शिबीर आयोजित केले असून ५ ते १३ डिसेंबर या कालावधित हे शिबीर होत आहे या शिबिराचे उदघाटन उषा शिलाई मशीन कंपनी चे भारताचे कॉर्डीनेटर अलोक शुक्ला यांचे शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ, श्रमिकचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपन्न झाला.
आत्मनिर्भर महिला व सक्षम महिला करण्याचे काम उषा शिलाई मशिन कंपनीच्या माध्यमातुन सूरू असून देशातील ३६००० महिलांनी शिवणकाम कला आत्मसात करून आपले कुटुंबाचा आर्थिक विकास करीत असल्याचे अलोक शुक्ला यांनी सांगितले.श्रमिक संस्था १९९५ पासुन जावळी तालुक्यात महिला सक्षमीकरण प्रकल्प राबवत आहे याच प्रकल्पाच भाग म्हणुन हा उपक्रम सुरु करणेत आला आहे अशी माहीती श्री आदिनाथ ओंबळे यांनी सांगीतली.
महिलांनी आपल्या प्रपंचातून वेळ काढून ९ दिवस मुक्कामी रहाण्याचे मोठे धाडस दाखविले आहे.आपण वेळेचा केलेला त्याग आपले भविष्य उज्वल घडवेल अशा भावना विलासबाबा जवळ यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला परेश नागपूरे, भंडार्याहून आलेल्या प्रशिक्षक सौ वर्षा मते, श्रमिकचे श्री लहु तरडे,लता देसाई,वासंती पाडळे, शिबिरार्थी व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.



