स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——
बामणोली.दि.२६.बामणोली येथे श्री.भैरवनाथ यात्रेनिमीत्त राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम, १५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत छान पार पडला.डिसेंबर,२०२३ रोजी श्री भैरवनाथ यात्रेनिमीत्त जय भैरवनाथ मित्र मंडळ बामणोली मुंबईतर्फे शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बामणोली बिटातील आपटी,तेटली,म्हावशी,शासकिय आश्रमशाळा बामणोली,जपरिषद शाळा बामणोली,पावशेवाडी,शेंबडी,न्यू इंग्लिश स्कूल बामणोली एकूण नऊ शाळा उपस्थित होत्या यामध्ये १५० विद्यार्थी उपस्थित होते.सकाळी आकरा वाजता शैक्षणिक उपक्रमास स्वागत गीताने सुरवात झाली.नंतर आश्रम शाळा बामणोली,जि प शाळा बामणोली व न्यू इंग्लिश स्कूल शाळा बामणोली यानी लेझीमचे प्रदर्शन केले.
त्यानंतर विवीध शाळांतील विद्यार्थ्यानी वक्तृत्व स्पर्धा,गायन स्पर्धा व डान्स स्पर्धेत सहभाग घेतला.त्यानंतर विद्यार्थ्याना जय भैरवनाथ मित्र मंडळ बामणोली नाश्ता देण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यानी मैदानी स्पर्धेत सहभाग घेतला.त्यानंतर विजेत्या स्पर्धकाना बक्षीस वितरण करण्यात आले व सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वितरण करण्यात आले व अतिशय शांत संयमी वातावरणात यशस्वी शैक्षणिक उपक्रम पार पडला.