स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- युवराज धुमाळ
मेढा.दि.२४. जावली तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेढा शहरात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून वाहतूक व्यवस्थेची वर्दळ कमी करण्यासाठी मेढ्यात सम-विषम तारखांना पार्किंग सुविधा करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
मेढा हे जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येणाऱ्या नागरिकांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असून भविष्यामध्ये एखादा गंभीर स्वरूपाचा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही’,बाजारपेठे नजीक तहसिल कार्यालय,पंचायत समिती,नगरपंचायत,सहकारी बँकांची कार्यालये असल्याने वाहनांच्या पार्किंगची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत असल्याने नगर पंचायत मेढा व पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून सातारा ते महाबळेश्वर जाणारे रोडलगत वाहणांचे सम-विषम पार्किंग त्याचप्रमाणे मेढा शहरात काही ठिकाणी वाहणांचे नो-पार्किंग दि.२६ जानेवारी २०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात केले जाणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सांगितले.
वाहतुकीचे नियमन करणेकरीता सर्व नागरीकांनी सदर उपक्रमास योग्य ते सहकार्य करावे. तसेच या योजने संदर्भाने आपले मत अगर काही अभिप्राय अगर सुचना असल्यास त्या मेढा पोलीस ठाणेस कळवाव्यात असे आवाहण सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सर्व नागरीकांना केले आहे.