
स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
दिपक पवार : दरेखुर्द येथे स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या शुभम घाडगे यांचा सत्कार
मेढा. दि.१३.अतीपर्जन्यवृष्टीच्या जावळी तालुक्यामध्ये शेती ही फक्त पावसाळी पिकांवर अवलंबून असल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही हाच विचार घेऊन जावळी तालुक्याच्या ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेद्वारे उत्तम अधिकारी घडत आहेत. येरूनकरवाडी येथील शुभम शिवाजी घाडगे याने देखील अतिशय परिश्रमातून स्पर्धा परीक्षेत राज्यात 53 वा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे.हे यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते दिपक पवार यांनी केले.

दरेखुर्द विकास सेवा सोसायटी मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 या स्पर्धा परीक्षेत येरुनकरवाडी येथील कु. शुभम शिवाजी घाडगे याने महाराष्ट्रात 53 वा क्रमांक पटकावत यश संपादन केले. या निमित्ताने त्याचा दरेखुर्द सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक पवार बोलत होते.
कार्यक्रमास दरेखुर्द सोसायटी चेअरमन बाबासाहेब पवार, बबनराव माने ,ज्ञानेश्वर माने ,सुरेश माने ,मोहन भिलारे, तानाजी पवार, मधुकर जाधव, सोसायटी सचिव उमेश घाडगे, ग्रामस्थ उपस्थित होते.
शुभम घाडगेने डी वाय पाटील कोल्हापूर या अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी ई सिविल ही पदवी संपादित करून गेली तीन वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून या परीक्षेत त्याने महाराष्ट्रात 53 वा क्रमांक पटकावत सुयश संपादन केले.या निमित्ताने सायगाव परिसरातील सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत असताना दरेखुर्द सोसायटी मार्फत त्याचा सत्कार करण्यात आला.
मायभूमीतील या सत्काराने मन भरून आल्याचे शुभम घाडगे याने सत्कारास उत्तर देताना सांगितले.