सातारासामाजिक

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान,सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-

सातारा.दि.२७. एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘क’ वर्गामध्ये राज्यात मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून,मेढा बसस्थानकाला रू.१० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. यासाठी मेढा आगार प्रमुख निता बाबर, स्थानक प्रमुख अजित मुगडे व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला यश मिळाले आहे.१५ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मेढा आगारास बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे.

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मे, २०२३ ते ३० एप्रिल, २०२५ या काळामाध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांतर वॉटरकुलर, घड्‌याळ, सेल्फीपॉईट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांची त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरुन अ. ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या १५ ऑगस्टाना बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातून राजकीय,सामाजिक,तसेच अनेक स्तरावरून मेढा बसस्थानकातील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले जात असून, या अभियानातून “आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक ही संकल्पना एसटी कर्मचान्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रुजविण्यास मदत झाली आहे.जावलीकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट असून मेढा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

या अभियानातून “आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये रुजविण्यास मदत झाली आहे.

आगार प्रमुख सौ.निता बाबर.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!