
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि.२२. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे तहसीलदार कार्यालय जावली आणि महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७,ऑगस्ट २०२४ रोजी “युवा मतदार जागृती आणि नव मतदार नोंदणी अभियान” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती करणे आणि नव मतदारांची नाव नोंदणी करणे या प्रमुख उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून तहसीलदार कार्यालय मेढा येथील निवडणूक नायब तहसीलदार सौ.जे.डी.मोहिते आणि महसूल नायब तहसीलदार सौ.शोभा भालेकर हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना मतदार नाव नोंदणी करण्यासाठी उपस्थित मान्यवरांकडून आवाहन करण्यात आले.या उपक्रमाला विद्यार्थ्यानी उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी नव मतदार म्हणून आपली नाव नोंदणी केली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे असे उपस्थितांना सांगितले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील १२० स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.सौ.धनश्री देशमुख यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य प्रा.बाळासाहेब उघडे,प्रा.कु.शुभांगी पाटील यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.