सातारासामाजिक

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महसूल अधिकाऱ्यांनी चिमुकल्यांचे केले स्वागत

स्टार ११ महाराष्ट्र

कुडाळ.दि.१८. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण हे आनंददायी व्हायला हवे.शाळा आणि पालक यांच्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण व्हावे.पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती त्याची संगत याबाबतीत जागृत असायला हवे.जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये कुठेही कमी नाहीत.शाळांचे रूप बदलत आहे.कुडाळच्या प्राथमिक शाळेतून दर्जेदार शिक्षण मिळत आहे.या दृष्टीने येथील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच प्रयत्नशील असते.त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत महसूल अधिकारी संजय बेलकर यांनी व्यक्त केले आहे.

शासन स्तरावरूनच शाळा प्रवेशोत्सवासाठी शाळांना भेटी देऊन नवागातांच्या स्वागत करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेला अधिकाऱ्यांनी भेट देत लहान चिमुकल्यांचे स्वागत केले.शालेय शिक्षणात गुणवत्ता टिकवण्यासाठी प्राथमिक शाळांना भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले होते.शाळेतील पहिले पाऊल त्यांच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव होता.यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटपही करण्यात आले. 

उत्साहाच्या वातावरणात बालकाचं प्राथमिक शाळेत पडणारे पहिलं पाऊल त्यांचा शाळा प्रवेशोत्सव हा वेगळाच अनुभव होता. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना असा आनंददायी अनुभव मिळणं,ही गोष्ट त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील.याप्रसंगी जावली महसूल अधिकारी संजय बेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी प्रशांत कदम,ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय प्रभाळे,कुडाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मालोजीराव (अण्णा) शिंदे,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद बावकर,सदस्य महेश पवार,मुख्याध्यापक जयश्री गायकवाड,युवा नेते आशिष रासकर,महसूल सेवक भैरवनाथ कांबळे,प्रशांत नायकुवडे, विजय कदम,शिक्षिका स्वाती बारटक्के, तसेच शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बन्सीधर राक्षे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित संदीप किर्वे यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे सचिन पवार यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!