
स्टार ११ महाराष्ट्र
मुसळधार पावसाचा फटका : पावसाने घराचे नुकसान
मेढा.दि.२९. वागदरे तालुका जावली येथील एका घरावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.घरामध्ये लोक उपस्थित नसल्याने सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. परंतु घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार,अतिवृष्टी मुळे जोरदार वाऱ्यासह आणि पावसामुळे वागदरे येथील शेतकरी दिपक शेलार यांच्या घरावर हे झाड उन्मळून पडले आहे.घराचे पत्रे आणि इतर भागांचे एक लाखाहून अधिकचे मोठे नुकसान झाले आहे.

जावली तालुक्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सतत संततधार पावसाची अतिवृष्टी चालू आहे. याच अतिवृष्टीचा फटका वागदरे गावासह अनेक ठिकाणी बसला आहे.सोमवार सकाळी पासून जोरदार पाऊस आणि वारा होता, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत करण्याची येथील नागरिकांनी मागणी केली आहे.



