सातारासामाजिक

उत्सव काळात विना परवाना डिजे वाजविल्यास गुन्हे दाखल करणार सपोनि सुधीर पाटील


साऊंड लेवल मशीन द्वारे आवाजाची मर्यादा तपासली जाणार


स्टार ११ महाराष्ट्र


केळघर.दि.२६.     गणेश उत्सव काळात तालुक्यातील व बाहेरून येणाऱ्या डीजे मालकांनी पोलिसांची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक असून विनापरवाना व मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी डीजे वाजवल्यास डिजे मालकावर गुन्हे दाखल करून मशीन व संबंधित वाहन जप्त केले जाईल असा इशारा मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर पाटील यांनी दिला आहे बैठकीत दिला.

गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेतलेली असली तरी गणेशोत्सव काळात डीजे मालकांनी स्वतंत्ररीत्या पोलीस ठाण्याची परवानगी काढणे बंधनकारक असून पोलीस ठाण्यात असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावयाचा आहे जे डॉल्बी डीजे मालक असा परवाना घेणार नाहीत व मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे डॉल्बी वाजवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही संबंधितांवर गुन्हे दाखल करून डीजे डॉल्बी मशीन व वाहन जप्त करून कारवाई केली जाईल बाहेरच्या डीजे डॉल्बी धारकांनी जावली तालुक्यात डीजे डॉल्बी वाजवायचा असेल तर त्यांनीही परवानगी काढणे बंधनकारक आहे.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बी डीजे ठरवतानाच संबंधिताला परवानगी घेण्याबाबत सांगावे,आवाज मर्यादित ठेवून व कायदा सुव्यवस्थेचे पालन करून डॉल्बी डीजे वाजवला अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.


             गणेशोत्सवातील मिरवणुकीत कार्यकर्ते डॉल्बी मालकाला आवाज वाढवण्यासाठी सक्ती करतात मात्र नंतरच्या कारवाईला संबंधित डॉल्बी मालकालाच तोंड द्यावे लागते गणेशोत्सव काळात साऊंड लेवल मशीन द्वारे आवाजाची मर्यादा तपासली जाणार मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे डॉल्बी वाजवल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा सपोनि पाटील यांनी बैठकीत दिला.


या बैठकीला डॉल्बी डीजे संघटनेचे अध्यक्ष अतुल पुसेगावकर उपाध्यक्ष किशोर पार्टी सचिव सुनील पवार सदस्य, संतोष गोरे तेजस गंगावणे गणेश नरुळे जगन्नाथ जाधव शिवाजी धनावडे उमेश बांदल आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!