अपघात

वाई बस स्थानकावर बसच्या धडकेत १३ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू 

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–

 

वाई, दि.१२. वाई येथील बस स्थानकावर आज दुपारी एस टी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. श्रावणी विकास आयवळे ( रा. सुलतानपूर, ता. वाई, ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून जोशी विद्यालयात ७ वी मध्ये शिकत होती.

वाई बालेघर गाडी क्र. एम एच १४ बी टी ०४९६ ही बस स्थानकावर फलाटाला लागत असताना विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गर्दी होती. गाडी पाठीमागे घेत असताना श्रावणीचा मागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परीक्षा दिन पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले राहणार नांदवळ वय 36 याला ताब्यात घेतली आहे.

 

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!