सामाजिक

अवैध दारू विक्री धंदे कायम बंद न झाल्यास,पुरोगामी संघटना व महिला आघाडीच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करणार

किरण बगाडे

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

मेढा. दि. १२ . जावली तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे या जावली तालुक्याने देशासाठी अनेक बलिदान दिलेले आहेत,  मात्र त्याच  जावली तालुक्यामध्ये बेकायदेशीर दारू धंदे,अवैध सुरू असलेला मटका,अवैध बेकायदेशीर धंद्यामुळे तरुणाई भरकटत चालला आहे.जावली तालुक्यामधील दारू धंदे मटका लॉटरी हे अवैध  बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आयु. दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघटना व महिला आघाडीच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे निवेदन आज जावलीचे तहसीलदार हणमंत कोळी यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे सातारा जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी यांना दिले.

 

जावली तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून  तसेच बेकायदेशीर दारू धंद्यामुळे अनेक महिला भगिनींचे कुंकू पुसले आहे.त्यांचे संसार उध्वस्त झालेले आहेत या दारू बंदी विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला मात्र बऱ्याच ठिकाणी  आज अवैध दारू धंदे फोफावले आहेत अखेर या व्यवसायंवर ठोस कारवाई होऊन हे अवैध व्यवसाय कायमचे बंद झाले पाहिजेत.

 

जावली तालुक्यातील अवैध दारू धंदे कायम स्वरुपी साठी बंद झाले पाहिजेत जावली तालुक्याचा वारसा जपण्यासाठी व महिलांच्या हितासाठी रिपब्लिकन पक्ष नव्हे तर पुरोगामी विचारांची चळवळ कायमस्वरूपी पाठीशी राहणार आहे काही दारूवाल्यांच्या सुपाऱ्या घेऊन काही ग्रामस्थानी ठराव केले असतील तर ते ठराव चौकामध्ये बॅनरबाजी करून व स्पीकरवर वाचन करावे येणाऱ्या काळामध्ये जावली मधील दारू धंदे मटका लॉटरी हे अवैध बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आयु. दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली च्या वतीने पुरोगामी संघटना व महिला आघाडीच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे किरण बगाडे यांनी यावेळी सांगितले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!