अपघात

तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केली अपघातग्रस्तांना मदत

मदतीमुळे मिळाले तात्काळ उपचार

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-सातारा दि.२६. सकाळी 11.20 च्या दरम्यान सातारा येथील ग्रेड सेपरेटर मधून गोडोलीच्या दिशेने जात असताना ग्रेड सेप्रेटर मध्ये 2 व्हीलर व पादचारी यांचा अपघात झाला. सातारा तहसिलदार राजेश जाधव हे सातारा तहसील कार्यालयामधून जात असताना सदरील अपघात प्रथम दर्शनी लक्षात आल्यानंतर त्यांनी क्षणाचा हि विलंब न करता स्वतः अपघातग्रस्त अक्षय वसंत सुतार राहणार संभाजी नगर शिवराज पेट्रोल पंपच्या पाठीमागे, शिवाजी विष्णू साठे (वय 60) रा.एकांबे ता.कोरेगाव जि.सातारा या दोन्ही अपघातग्रस्तांना स्वतः गाडीत घेवून ते स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल झाले.या मदत कामात त्यांना शहर वाहतूक शाखेचे पोलीस राहुल भोये व संतोष पवार यांनी तात्काळ सहकार्य केले . तसेच तहसीलदार यांचे वाहन चालक वसंत संकपाळ यांनी पुढे होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज दोन अपघातग्रस्तांचे जीव वाचले. या कार्याबद्दल तहसीलदार राजेश जाधव व त्यांचा सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे .00000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!