स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
सातारा. दि.२६. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणोली कसबे येथील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कै.रामचंद्र मारुती पवार यांचे स्मरणार्थ युवा मंच मुंबईचे संस्थापक श्री रविंद्र पवार व सौ.दिपिका पवार यांचे वतीने आज दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या शैक्षणिक प्रगती बद्दल श्री. रविंद्र पवार यांनी समाधान व्यक्त होत.या कार्यक्रमातून शाळेला वस्तूरूपाने १७००० रुपयाचा शैक्षणिक उठाव प्राप्त झाला.
यावेळी अविनाश पवार,अंजली अविनाश पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील,सदस्य माजी सरपंच राजेन्द्र संकपाळ,श्री. सुभाष पवार.श्री भरत शेठ पवार,सचिन पवार, विजय पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
राजेन्द्र इंगवले यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविकता केली.स्वागत मुख्याध्यापक दिपक भुजबळ यांनी केले.मिलन शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.