महाराष्ट्रसातारासामाजिक

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विशेष कार्य व कीर्ती संपादन करणारे आदरणीय समाजभूषण श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांचाआज वाढदिवस

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

केळघर.दि.१६.श्री केदारनाथ धाम पंच देवालय उभारणीमुळे नित्रळ गावची श्री क्षेत्र नित्रळ म्हणून नव्याने ओळख प्राप्त झाली,या संकल्पनेचे शिल्पकार आणि त्यांच्या उपस्थितीत जन्मदिवसाचे अवचित्य साधून ६ जून ते १४ जून रोजी संपूर्ण गावातील ५० वयाच्या पुढील,वयोवृद्ध अशा १५० ग्रामस्थांना मोफत श्री काशी विश्वेश्वर, प्रयागराज आयोध्या तीर्थयात्रा व देवदर्शन घडवून आणणारे व तीर्थयात्रेतून आणलेल्या गंगा जलाचे श्री केदारनाथ धाम येथे सार्वजनिक गंगा पूजन करून श्री केदारनाथ धाम ते श्री केदारनाथ धाम उरमोडी परिक्रमाची पहिली सुरुवात करून परळी विभागातील भाविकांना त्यांच्या गावातच गंगा पूजन व दर्शन घडवून आणणारे समाजभूषण आदरणीय श्री भाई वांगडे यांचा वाढदिवस १६ जूनला दुपारी ४ वाजता मोठ्या थाटामाटात ज्ञानश्री कॉलेजमध्ये साजरा होत आहे.
१६ जून हा दिवस सातारा तालुक्यातील नित्रळ गावचे सुपुत्र व महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विशेष कार्य करून कीर्ती संपादन करून सातारा जिल्ह्याचे नाव उज्जल करणारे आदरणीय समाजभूषण श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे अर्थात भाई यांचाआज वाढदिवस शिवसह्याद्री पतसंस्था स्थापन करून शतकोटीचे उद्दिष्ट अवघ्या वीस-पंचवीस वर्षात सामाजिक बांधीलकी संभाळून अव्याहतपणे कर्मचारी यांचे हित जपून पूर्ण करून नवा विक्रम निर्माण केला.सातारा सहकारी बैंकेचे अध्यक्ष म्हणून व सहकार श्रेत्रातील विविध पदांची,संस्थेची ते यशस्वी धुरा संभाळत आहेत.

आर्थिक राजधानी मुंबईत जरी त्यांच्या कार्याची सुरुवात झाली असली तरी त्यांना आपल्या मातृभूमीचा विसर पडला नाही.गजवडी येथे ‘ज्ञानश्री इंस्टिट्यूट’ नावाने इंजीनियरिंग कॉलेज सातारा शहरात अनेक वर्षांपासून आणि गजवडी येथे मागील वर्षी भाईंच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कुलचे उदघाटन झाले. इंजिनिअरिंग कॉलेज व इंग्लिश मिडीयम स्कुल स्थापन करून परळी विभागात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान केले आहे.कॉलेज जवळ असलेले त्यांचे श्री समर्थ दर्शन थीमपार्क बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते.त्यांच्या जन्मगावी नित्रळ येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले नित्रळकरांचे ग्रामदैवत श्री केदारनाथ धाम पंच देवालय हे सातारा तालुक्यातील विशेष वैशिष्ट्य असणारे व श्रीक्षेत्र स्वरूप निर्माण करणारे आहे.

नित्रळ गावाचं भाग्य मोठं
श्रावण बाळाच्या रूपांनं
भाई आलेत जन्माला
त्यांची पुण्याई थोर मोठी
चला जाऊया काशी,प्रयाग,अयोध्येला,भाई यांच्या नेतृत्वाचा गुण म्हणजे मान आणि सन्मान,लहान मोठे याचा ते कधीही विचार करीत नाहीत,म्हणून तर ते नित्रळ तरुणांचे प्रेरणास्थान आहेत.नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे भाई आणि भाईंसारखे दूरदर्शी व अभ्यासू नेतृत्व सहकार श्रेत्राला व महाराष्ट्राला तसेच नित्रळ गावाला प्राप्त झाले आहे.अशा या अजब रसायनाला ग्रामविकास मंडळ,नित्रळ व शिवसह्याद्री परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!