महाराष्ट्रसातारासामाजिक

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजसेवेचे व्रत कौतुकास्पद:अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम

स्टार ११ महाराष्ट्र प्रतिनिधी – अभिजीत शिंगटे

मेढा.दि.०८.  डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा ता.अलिबाग यांच्यावतीने महाराष्ट्रभुषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ शुक्रवारी ( ८ जुलै ) जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा येथे शंभर वृक्षांचे वृक्षारोपन संपन्न झाले.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकोबारायांच्या वचनानुसार वृक्षच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपुर्ण कार्य करीत आलेले असुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपन,वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे.

प्रतिष्ठानने स्वीकारलेले समाजसेवेचे व्रत कौतुकास्पद असुन वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष कदम यांनी केले.वृक्षारोपनप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष कदम,आयुष विभागाच्या डॉ.संजीवनी शिंदे,डॉ.पी.एस.ननावरे,सदस्य उपस्थित राहून वृक्षारोपन करण्यात आले.

मानवाला जगण्यासाठी प्राणवायुचे उत्सर्जन;अन्न, वस्त्र,निवारा,औषध,मुलभुत गरजांची उपलब्धता;पावसाला पृथ्वीकडे आकर्षित करण्याचे कार्य वृक्षच करतात.वृक्षांची संख्या कमी होत असल्याने मानवी जीवनावर दुष्परिणाम,ऋतुचकावर अनिष्ट परिणाम होऊन पाऊस नियमितपणे पडत नाही;काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी नदयांना अचानक महापुर तसेच औष्णिक स्तर वाढू लागल्याने वृक्षारोपन,वृक्षसंवर्धन हे आपले उत्तरदायित्व आहे.यामुळे स्वयंस्फुर्तीने वृक्षलागवड करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातुन होत असुन समाजासमोर आदर्श उभा केला आहे.

पर्यावरणाचे रक्षण,संवर्धन यासाठी पदमश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी,डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी,श्री उमेशदादा धर्माधिकारी,श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सदस्यांनी विविधप्रकारची जंगली झाडे,औषधी झाडे,फुलझाडे लावून प्रतिष्ठानच्या माध्यमातुन संरक्षण केले जाणार आहे.रूग्णालय परिसरात गुलाब,जास्वंद,मोगरा,चाफा,शिसु,शिवन,आवळा,कांचन,उंबर,शिरस अशा विविधप्रकारच्या शंभर औषधी,जंगली,फुलझाडांची लागवड करण्यात आली.जिल्हाभर विविध ठिकाणी तसेच आपापल्या परिसरात सदस्यांकडून वृक्षारोपन करण्यात आले.

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपनाचे कार्य कौतुकास्पद आहे.अनेक समाजहितपयोगी उपक्रमांतुन समाजात जनजागृती होण्यास मदत होत आहे.अनेक पिढ्यापासुन समाजसेवेचे कार्य करत असलेल्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यास आमचे पुर्णतःसहकार्य असेल.तसेच त्यांचा मी कायम ऋणी असेन.

डॉ.सुभाष कदम/अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

      

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!