
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संजय वांगडे
कुसुंबी प्रतिनिधी. दि.०६ कुसूंबी ता.जावली येथील पांगारा पूल परीसरातील कूसुंबी गावची स्मशानभूमीच्या शेड वरती आंब्याचे महाकाय झाड पडले मुळे ऐन पावसाळ्यात स्मशान भुमिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कुसुंबी येथे जो गावामध्ये लोध्या आंबा म्हणून प्रसिद्ध होता तो पडून स्मशानभूमीचे नुकसान झाले आहे मा.सरपंच कै.जयसिंगराव चिकणे यांच्या प्रयत्नातून सदरची स्मशानभूमीचे काम झाले होते. कुसुंबीकरांना सोयीची स्मशानभूमी म्हणून या स्मशानभूमीची ओळख आहे,तरी ऐन पावसाळ्यात झालेल्या या घटनेने लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
तरी लवकरच सदर स्मशान भुमीची व त्याकडे जाणारे रस्त्याची दुरुस्ती व्हावी ऐन पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाली तर तिथे जाण्यास खूप अडचणी येत असतात त्यामुळे तातडीने स्मशानभूमीची दुरुस्ती व्हावी अशी मागणी कुसुंबीकर ग्रामस्थ करीत आहेत.



