बैलाच्या मृत्यू नंतर विधीवत केले अंत्यंसंस्कार शेतकर्याने समाजात ठेवला वेगळा आदर्श…

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे
कुसुंबी. दि.०३. श्री क्षेत्र कुसूंबी (बालदारवाडी) येथील शेतकरी श्री. साधू दगडू वेदे हे आपल्या वयाच्या पंधरा वर्षांपासून शेती करतात, लहानपणापासून शेतीची आवड असलेले व लहानपणीच शेतीच्या कामाची जबाबदारी स्विकारलेल्या साधू वेंदे यांना गुराढोरांची, बैलांची आवड निर्माण झाली होती.
२०/२२ वर्ष शेती कामात अनमोल साथ देणार्या पोपट नावाच्या बैलांने सोमवार २५ जुलै रोजी रात्री अकरा वाजता जगाचा निरोप घेतला.वेंदे हे स्वतःच्या पोटच्या मुलांन प्रमाणे पोपट वर प्रेम करीत होते.आपल्या लाडक्या बैलाचे मृत्यु नंतरचे सर्व विधी पार पाडण्याचे त्यांनी ठरवले त्यानुसार मंगळवार २६ जुलै रोजी पोपट या बैलाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तसेच तिसऱ्या दिवशी गुरुवार दि. २८ जुलै रोजी सावडणे विधी पार पाडला माझ्या बैलाच रं शिंड जशी महादेवाची पिंड म्हणून महान कलाकार स्वर्गीय दादा कोंडके यांनी लिखाण केलेल्या गीताची आठवण करुन देणाऱ्या हिंदूधर्मातील पवित्र असलेल्या श्रावण महिन्यातील शुभारंभ असणारा सण म्हणून ओळख असलेल्या “नागपंचमी ” ला कुसुंबी, मेसाचीवाडी, बामणवाडी, जांभूळ वाडी, बालदारवाडी येथील शेतकरी बांधवांना भोजनासाठी आमंत्रित करुन पोपट या बैलाचे उत्तर कार्य करून वेंदे कुटुंबाने समाजा पुढे वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल साधु नाना यांचे जावली तालुक्यातील शेतकरी कौतुक करीत आहेत.
जय जवान, जय किसान ज्या शेतकऱ्यामुळे तुम्ही, आम्ही अन्नाचा कण खातो व ज्या जवान बांधवांमुळे आनंदाने झोपी जातो त्या किसान व जवानामुळे आपला भारत देश समृद्ध आहे त्या भारतीय संस्कृतीत रूढी परंपरा शाबूत आहेत आमचे गावचे हाडाचे शेतकरी साधुनाना यांचा आम्हा कुसुंबीकरांना अभिमान आहे!
श्रीकांत आप्पा चिकणे.
समाज सेवक




