महाराष्ट्रसातारासामाजिक

ध्येय निश्चित असेल तर यश हमखास मिळते. सपोनि अमोल माने.

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ 

मेढा.दि.०३.जीवनात यश मिळवायचे असेल तर ध्येय निश्चित असले पाहिजे. ध्येय मोठे असेल तर छोट्या छोट्या परीक्षा अगदी सहजपणे साध्य करता येतात. असे प्रतिपादन मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी जावली करिअर अकॅडमी च्या अभ्यासिकेच्या उदघाटनावेळी केले. यावेळी मेढ्यातील उद्योजक सर्जेराव पार्टे, मारुती चिकणे, प्रदीप धनावडे, कृषी सहाय्यक भानुदास चोरगे यांच्यासह अकॅडमीचे संस्थापक संतोष कदम व संचालिका राजश्री कदम, प्रशिक्षक आदित्य जाधव, योगेश कदम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
जावली करिअर अकॅडमीच्या अभ्यासिकेचा उदघाटन सोहळा आज मेढा येथे संपन्न झाला. सर्वसोयीसुविधांनी युक्त अशी जावली तालुक्यातील पहिलीच अभ्यासिका जावली अकॅडमीच्या माध्यमातून सुरू आली आहे. जावली तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी यापूर्वी थेट सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागायचे. तालुक्यात कुठेच अभ्यासिकेची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी जावली अकॅडमी कडून अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आली. या अभ्यासिकेत प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था, चार्जिंग पॉईंट, मोफत वायफायची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना राज्यसेवा परिक्षेचा पेपर सुद्धा दिला जाणार आहे. कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांनी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत राजश्री कदम यांनी केले.सूत्रसंचालन योगेश कदम यांनी करून आभार विश्वनाथ डिगे यांनी मानले…….

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!