महाराष्ट्रशैक्षणिकसातारा
प्राथमिक शाळा भणंग येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – शेखर जाधव
मेढा.दि.१४.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भणंग येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गावचा इतिहास या विषयांतर्गत भणंग गावचा प्रेरणादायी इतिहास श्री.महादेव जाधव,श्री.सुरेश जाधव,श्री.गणेश जगताप,श्री.अशोक लकडे यांनी सांगितला.

यावेळी डॉ.नलवडे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुरुवातीला गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. गोपाळ पंगत या उपक्रमा अंतर्गत सौ.सुषमा दत्तात्रय जाधव यांनी विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप केले.

यावेळी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थितांचे स्वागत अशोक लकडे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.टी.धनावडे यांनी मानले.



