
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये ग्रंथपाल दिन साजरा
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा. दि.१४. दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. एस आर नगरकर यांनी केले प्रस्ताविकात ग्रंथपाल दिन का साजरा केला जातो डॉ. एस आर रंगनाथन यांचे जीवन चरित्र तसेच कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय श्री अजित राक्षे सर यांचे वाचन संस्कृती विकास या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपले जीवन परिवर्तन करताना वाचनास किती महत्त्व दिले पाहिजे ते सांगितले. वाचाल तर वाचाल हा बहुमूल्य संदेश दिला. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही असे बहुमूल्य मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ग्रंथपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या ग्रंथालयांमध्ये जो ज्ञानसाठा उपलब्ध आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा असे मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी केला. आभार प्रदर्शन श्री वसंत धनवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री अविनाश मदने , जगदीश ओंबळे, आबासाहेब देशमुख यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.




