कृषीमहाराष्ट्रसातारासामाजिक

रानभाजीने आरोग्य समृद्ध होते.
रानभाजीचे महत्वपूर्ण फायदे तरुणांनी घ्यावेत
तहसीलदार राजेंद्र पोळ


स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी- मोहन जगताप

सातारा.दि.२३.जावळीच्या एतिहासिक तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील डोंगराळ भागात अनेक वनस्पतीजन्य अशा वनस्पती उगवत असून जुन्या जाणत्या लोकांनी या ठिकाणच्या रान भाज्यांच्या वंशपरंपरागत सेवनाने त्यांचे आयुष्यमान वाढले अशा रान भाज्यांची माहिती तालुक्यातील लोकांसोबत जिल्ह्यातील सर्व नवयुवक यांना होणे गरजेचे असून हा
रानभाजी महोत्सव हा मर्यादित न राहता तो जिल्हास्तरावर व्हावयास प्रयत्न करून जावळीच्या डोंगरात पिकणाऱ्या भाज्यांची माहिती सर्वदूर पसरविण्यात कृषि विभागानेही लक्ष घालण्यासाठीच पुढे येण्याचे आवाहन जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले.


जावली तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आज 2022/23 च्या रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड,तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कृषि विज्ञान केंद्र बोरगावचे महेश बाबर, संग्राम पाटील, आ. शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्रा.प्रमोद घाडगे व तालुक्यातीलच बहुसंख्य रानभाजी विक्रेते उपस्थित होते.


जावली तालुक्यातील विविध गावचे सरपंच शेतकरीवर्ग व विविध ठिकाणच्या महिला बचत गटांना व विविध लोकांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता
मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास अनेक जणांनी सहभागी घेवून रानभाज्यांची माहिती घेतली मान्यवरांचे स्वागत तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख यांनी केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!