Uncategorized

शहीद रविंद्र बबन धनावडे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान करून वंदन करूयात

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे

मेढा.दि.२३. जावळी तालुक्यातील मोहाट गावचे सुपुत्र शहीद रविंद्र बबन धनावडे यांचा पुण्यस्मरण दिन शुक्रवार दि २६ ऑगष्ट २०२२ रोजी असलेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सकाळी १० वाजता शौर्यचक्र सन्मानित शहीद रविंद्र बबन धनावडे यांचे स्मारकाचे पूजन . सकाळी १०/३० वाजता शौर्यचक्र सन्मानित शहीद रविंद्र बबन धनावडे यांच्या सर्वोच्च बलीदान स्मृती प्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अक्षय ब्लड बॅक सातारा,रक्तदान हे शौर्य स्मारक मोहाट ता जावळी या ठिकाणी होणार आहे रक्तदान शिबिराचे आयोजक शहीद रविंद्र बबन धनावडे मेमोरिअल फाउंडे,नेहरू युवा मंडळ मोहाट करीत आहे सदर रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट देणेत येणार आहे सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अधिकारी वर्ग माजी सैनिक लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत राहणार आहेत विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ ,नवजिवन विकास मंडळ , विर हनुमान ग्रुप , झंकार / त्रिमुर्ती / इलेवन / गुरुदेव क्रिकेट क्लब , प्रबुद्ध विकास मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!