
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज
मेढा दि.२२. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करून प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे उद्दगार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सातारा मेढ्याचे सुप्रसिद् डॉ अविनाश वरांडे यांनी काढले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्व खेळाडूंचे कौतुक करून जिद्द चिकाटी आत्मविश्वासआणि सातत्य असल्यास कोणत्याही खेळामध्ये यशस्वी होणे अवघड नसते असे प्रतिपादन केले. जावळीची राजधानी मेढा येथे असलेले जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणुन सातारा मेढ्यातील सुप्रसिद्ध डाँ अविनाश वरांडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा प्रमोद घाडगे होते जिमखाना विभागाकडून वर्षात पार पडलेल्या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा उल्लेख करण्यात आला वर्षभरातील खेळाडूंनी केलेल्या कामगिरींचे अहवाल वाचन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश जवळ यांनी केला. बक्षीस मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फेट्यांचा मान देण्यात आला. सर्व खेळाडूंचे ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बिभवीचे समाजसेवक राजेंद्र जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्रा. गायत्री जाधव तसेच आभार प्रदर्शन प्रा. शंकर गेजगे यांनी केले.



