महाराष्ट्रसातारासामाजिक

वाढदिवसाच्या दिवशी झाले साहेबांचे आकस्मित निधन…..

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ

 

  केळघर.दि.२२.जावली तालुक्यातील वरोशी सारख्या एका लहानशा गावातून आयडीबीआय बँकेच्या उपमहाव्यवस्थापक पदापर्यंत मोकाशी यांचा प्रवास हा अतिशय खडतर असा होता,सर्व सामान्य कुटुंबातील विजयराव मोकाशी यांनी आपल्या प्रेमळ व विनम्र स्वभावाने जावळी तालुक्यातील जनतेच्या मनात आपुलकीचे व जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले होते.

वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु असताना रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी त्यांचा  वाढदिवसाचा केक कापत असतानाच त्यांचे सहकारी,जावळी तालुक्यातील काही निवडक मित्रांच्या समोरच बोंडारवाडी धरण समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचे हृदयाचे तीव्र झटक्याने मुंबई येथे ही दुर्दैवी घटना आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आपला हा मनुष्य जन्म हा समाजाचं काहीतरी देणं लागतो या पवित्र,निस्वार्थी भावनेतून जावळी तालुक्याचा  विकास व्हावा मेढा-केळघर विभागातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून आपला जावली तालुका सुजलाम सुफलाम होऊन, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही पवित्र भावना उराशी बाळगून बोंडारवाडी धरण कृती समिती स्थापन करून गेली अनेक वर्ष बोंडारवाडी धरण प्रकल्प होण्यासाठी लढा देत होते.विजयराव मोकाशी गेली अनेक वर्ष जावलीतील सामान्य जनतेला हक्काचे पाणी मिळावे यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्याचे स्वप्न पाहणारे मोकाशी साहेब, आज सर्वांच्या डोळ्यात पाणी आणून सर्वांना सोडून निघून गेले आहेत. जावळी तालुक्यातील ५४ गावातील शेतकर्‍यांच्या शेतीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी जावळी तालुक्यातील ५४ गावच्या लाखों लोकांना एकत्रित करून, “पाणी हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच” असा हुंकार देत एकीची वज्रमूठ तयार करून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थी भावनेने शासनदरबारी पाठपुरावा करत व प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून समाजासाठी लढा देणारे एक संवेदनशील व्यक्तीमत्त्व होते.शेवटच्या श्वास घेताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी इच्छा व्यक्त केली होती. 

      दरम्यान सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रात्री असे काही होईल असे कोणाच्या स्वप्नातही वाटले नव्हते, त्यांच्या जन्मगाव वरोशी पासून ते साताऱ्या पर्यंत त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली होती.केळघर येथे त्यांच्या अंत्य यात्रे आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले,मा. आमदार सदाभाऊ सपकाळ,विलास बाबा जवळ,यांच्यासह हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच केळघर विभागातील लहान थोर पुरुष,महिला यांच्यासह जमलेल्या अफाट जनसमुदायाने विजयराव मोकाशी यांना अखेरची श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिला.

केळघर विभागातील जमलेल्या अफाट जनसमुदायाने विजयराव मोकाशी यांना वाहिली श्रद्धांजली

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!